मदनसुरी (जि.लातूर) : माकणी (ता.लोहार) येथील निम्न तेरणा धरणाच्या पाण्याचा मोठा विसर्ग तेरणा नदीला होत असल्याने तेरणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पाण्यामुळे निलंगा तालुक्यातील नदी काठच्या जेवरी, सांगवी, मदनसुरी, रामतीर्थ, कोकळगाव, धानोरा, लिंबाळा,येलमावडी,नदी हत्तरगा या गावातील जवळपास चार ते पाच हजार हेक्टर वरील खरीप पीकाचे नुकसान झाले.नदीच्या दोन्ही बाजूने अर्धा किलोमीटरपर्यंत पाणी पसरले असून या नदीवरील मदनसुरी, नदी हत्तरगा,लिंबाळा या तिन्ही बॅरिज वरून पाणी वाहत असल्याने तालुक्यापासून कासार सिरशी,मदनसुरी, कासार बालकुंदा,सरवडी या गावा सह अनेक गावाचा संपर्क रात्री पासून तुटला आहे.
(Video : सिद्धनाथ माने )
#Latur #heavyrain #rainupdate #marathinews #sakalnews #sakal #marathwada #maharashtra #flood #overflowriver #sakalmedia